औरंगाबाद - पेट्रोल टँकर चालकाला लुटणाऱ्या चौकडीला एका महिला पोलिस अधिकाऱ्याने पाठलाग करुन जेरबंद केले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री बीड बायपास रस्त्यावर घडली. चारही लुटारुंविरोधात सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीला अटक केल्यामुळे या मार्गावरील अनेक चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
नाकाबंदीवेळी चालकाने दिली
माहिती
शुक्रवारी रात्री
औरंगाबादहून मुंबईकडे निघालेल्या पेट्रोल टँकरला (एम एच ०४ एचएस २०५२) बीड बायपास
रस्त्यावर टीव्हीएस शोरुमसमोर अडवण्यात आले. चालक राजेश लांडेकर यांना बेदम मारहाण
करुन त्यांच्या खिशातील रक्कम चार जणांच्या टोळीने पळवली. टँकर चालक राजेश यांनी या घटनेची माहिती
नाकाबंदीवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक सुशीला खरात यांना सांगितली.
उपनिरीक्षक सुशीला खरात
यांनी चालकाकडून लाटारुंची माहिती घेऊन तत्काळ त्यांचा शोध सुरु केला. लुटारुंच्या
चौकडीचा साधारण एक किलोमीटर पाठलाग करुन त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
यावेळी उपनिरीक्षक सुशीला खरात यांच्यासोबत मरकड, व्ही.एन. सनान्से, एस.बी.चव्हाण,
एच.के. बहुरे हे पोलिस कर्मचारी होते.
असे आहे आरोपींचे नाव
बीड बायपास रोडवर वाढलेल्या
चोरी आणि लुटालुटीच्या घटनांचा या चौकडीला पकडल्यानंतर उलगडा होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी पकडलेल्या सातार परिसरातील राजू सुधाकर सोनवणे (३१), वृद्धेश्वर मधुकर गिरी (१९), नजीर निजामुद्दीन
शेख (२४), संदीप जयसिंग बरथुने (२७) यांचा समावेश आहे.












